Case Studies
महिलांनी फुलवली फुलशेती.....
`माविम`च्या (महिला आर्थिक विकास महामंडळ) बचतगटाचे नेटवर्क खूप मो�� े आहे. ग्रामीण भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून विकास साधला आहे. तो पाहण्यासा�� ी मी थेट मुंबईहून नाशिकला निघालो. सोबत `माविम`च्या उपमहाव्यवस्थापक (ज्ञान व्यवस्थापन व प्रशिक्षण) अश्विनी ज�� ार होत्या. `माविम`च्या जिल्हा समन्वय अधिकारी ज्योती निंभोरकर यांनी आम्हाला बचतगटाविषयी भरभरून सांगितलं. महाराष्ट्रात कु�� े महिलांनी सामुहिक शेतीचे प्रयोग केले आहेत. तर कु�� े अख्ख्या गावचा चेहरा-मोहराच बदलण्यात महिलांचा वाटा आहे. ते पाहण्यासा�� ी `माविम`च्या अध्यक्षा श्रीमती प्रभाताई ओझा, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. अ.द.काळे, प्रकल्प संचालक श्री. संदीप जाधव, उपमहाव्यवस्थापक (उपजिविका आणि उद्योजकता विकास) श्री. अमित शर्मा यांनी भेट दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात आम्ही पोहोचलो. तिथे `माविम`च्या बचतगटांच्या महिलांनी ग्लॅडिओलसची (फुलशेती) शेती केली आहे. गावातील बचतगटाच्या सर्व महिला आदिवासी, दुसरी गोष्ट म्हणजे सर्व महिला भूमिहीन. परंतु, त्या सर्व महिला शेतीच्या कामात तरबेज. `माविम`च्या १२ गटांपैकी ६ गटातील महिलांनी शेतकऱ्यांकडून भाड्याने शेती घेऊन टोमॅटो, गहू, शेंगा, कोंथिबीरचे उत्पादन घेतले आहे. त्यांना वर्षाला दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
दिंडोरी तालुका तसा फुलशेतीसा�� ीच प्रसिद्ध आहे. गुलाब व झेंडु या फुलांचे उत्पादन इथं मो�� ्या प्रमाणात आहे. बचतगटातील महिलांनाही फुलशेती करावी वाटत होती. दरम्यान, त्यांनी ग्लॅडिओलस फुलशेतीतील बारकावे आणि शास्त्रीय पद्धतीने शेती कशी करावी, याची माहिती घेतली. विभागीय संनियंत्रण व मूल्यांकन अधिकारी संदीप मरा�� े यांनी महिलांच्या सक्षमीकरणाविषयी खूप प्रयत्न केले आहेत.
फुलशेतीचा प्रयोग आदिवासी महिला पहिल्यांदाच करीत होत्या. त्यांना योग्य मार्गदर्शन नव्हते. पण, त्यांची जिद्द, चिकाटी जोरात होती. आम्ही ते करणारच हा विश्वास त्यांच्याकडे होता. बाईंनी कु�� ेच मागे राहायचं नाही, ही भावना मनात �� ेवून त्यांनी अर्धा एकर जागा दोन वर्षासा�� ी भाड्याने घेतली. ग्लॅडिओलस लागवडीसा�� ी चांगल्या कंदाची निवड करण्यासा�� ी कांदा व द्राक्षे संशोधन केंद्र, पिंपळगाव येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर साताऱ्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून तीन रुपये दराने ४० हजार कंद मागविले. साधारणतः तीन दिवस कंद सावलीत पसरवून �� ेवल्यावर बुरशीनाशक औषधित बुडवून कंदाची लागवड करण्यात आली. वेळोवेळी झाडांची निगा राखण्यात आली. साधारणतः फक्त दोन महिन्यांच्या काळात बांबूसारखी झाडे वाढली.
ग्लॅडिओसचे पहिले फुल पाहिले, आणि महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुंबईत मो�� ी बाजारपे�� असल्याने १८० फुले दादरच्या फुलमार्केटला विक्रीसा�� ी पा�� विली. ३१ डिसेंबरला ख्रिसमस नाताळचे औचित्य साधल्याने फुलांना चांगला दर आला. महिलांचा आनंद आणखी वाढला. केलेल्या कष्टाला फळ आले, ही भावना त्यांच्यात आली.
जानोरी गावातील प्रगती बचत गटांची ही फुलशेती पाहण्यासा�� ी अहमदनगर येथील महिलांनी भेट दिली. निफाड तालुक्यातल्या महिलांनी हा नाविण्यपूर्ण फुलशेतीचा उपक्रम करणार असल्याचं बोलून दाखविलंय.
