Case Studies
पारधी महिलांनी केली मागासलेपणाची पारध
चंद्रपूर जिल्हयातील वरोरा तालुक्यातील चिनोरा येथील यशस्वी कथा
केवळ बचत गट उभारुन महिला सक्षमीकरणाचा उद्देश सफल होणार नव्हता. कारण महिलांचा सशक्त आर्थिक विकास हेच माविमचे ध्येय असल्याने कुटुंबाचा रोष पत्करुन चळवळीत सहभागी झालेल्या महिलांना आर्थिक सुबत्तेकडे घेऊन जाणे महत्त्वाचे होते. यामुळे मग या सामाजिक गटाला साजेशा व्यवसायाची चाचपणी सुरु झाली. या चाचपणीतूनच कुक्कुटपालनाच्या व्यवसायावर शिक्कामोर्तब करण्यात आले.........
आपल्या समाजातील आजही दुर्लक्षित असलेला घटक म्हणजे पारधी समाज. परंपरांच्या बेडीत अडकलेल्या या समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यातही महिलांचा शिक्षणाचा पट आजही कोराच आहे. फासेपारधी या पारंपारिक व्यवसायामुळे पांढरपेशा समाजाच्या नकारात्मक नजरांचे लक्ष्य �� रलेल्या या समाजाला शासनाच्या योजनांचे लाभ तर सोडा, पण निवडणूक ओळखपत्राची गरजही फारशी कळलेली नाही. शिक्षित,अज्ञानी आणि काही अंशी गुन्हेगार म्हणून ओळखली जाणारी ही जमात सतत गावकुसाबाहेरच राहिलेली. हा समाज एकूण समाजाच्या मुख्य धारेपासून सतत या ना त्या परिसरात कारणास्तव कायम दूरच राहिला. गावात किंवा गावाच्या आसपासच्या परिसरात एखादा गुन्हा घडला तर पोलिसांची गाडी हमखास या पारध्यांच्या टोल्यावर येणारच. आजही हेच चित्र आहे. हे झालं पारध्यांचं वास्तव. मात्र आता या वास्तवाला नाकारण्याच्या प्रकियेला सुरुवात झाली आहे. आपला भूतकाळ विसरुन उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यास हा समाज आता सरसावला आहे. चंद्रपूर जिल्हयातील वरोरा तालुक्यातील पारधीटोला-चिनोरा येथील पारधी समाजाच्या महिलांनी या परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचा मार्ग अवलंबिला आहे. अर्थातच यासा�� ी त्या महिलांना साथ मिळतेय ती महिला आर्थिक विकास महामंडळाची. माविमच्या कल्पक योजनेअंतर्गत आणि योग्य मार्गदर्शनाखाली या समाजातील महिलांनी कुक्कुटपालनचा व्यवसाय सुरु केला आहे. यात त्यांना जे यश मिळते आहे ते पाहता पारधीटोल्यावरील महिलांनी स्वकर्तृत्वाने आणि माविमच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने मागासलेपणावर मात केली आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर या महिलांनी मागासलेपणाची पारध केली आहे !
साधारण दहा वर्षापूर्वी येथे महिला सक्षमीकरणाला प्रारंभ झाला. मात्र, केवळ कागदावर स्वयंसहाय्यता बचत गटांच्या सदस्यतेशिवाय ही गाडी काही पुढे गेली नाही. हा पारधी समाज तालुक्याच्या �� िकाणापासून जवळ असला तरी विकासाचे वारे त्यांच्या टोल्यावर काही वाहत नव्हते.
जेमतेम 70 चुली असलेला हा पारधीटोला पूर्णपणे आदिवासींचा गाव आहे. स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोलायचे झाले तर दोहोंचे संख्याबळ एक समान आहे, इतकेच म्हणता येईल. त्यांचा मूळ व्यवसाय किंवा उपजिविकेचे साधन म्हणजे जंगलातून तितर,बटेर,लाव्हा यांसारख्या रानपाखरांची किंवा अन्य जंगली प्राण्यांची शिकार करणे हे आहे. जी केलेली शिकार विकून आलेल्या पैशांतून मनसोक्त दारु पिणे आणि एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहणे, हा जणू त्यांच्या जगण्याचा दिनक्रमच म्हणावा लागेल. घररातील कर्त्या पुरुषाला दया आलीच तर तो कधी तरी अन्नाचे चार दाणे घरात आणणार किंवा मग विटभट्टीवर तर कधी बकरी पालनासा�� ी लागणारा पाला जंगलातून आणून तो विकायचा आणि त्या कमाईतून घरातील स्त्री तिच्या कच्च्याबच्च्यांचे पोट भरणार. पारध्यांमधील महिलाही मो�� या प्रमाणात व्यसनांच्या आहारह गेल्या आहेत. अशा बिकट परिस्थितीत पारधी टोल्यांवर महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम राबविणे मो�� े जिकरीचे काम म्हणायला हवे. मात्र ही लढाई लढण्यात माविम यशस्वी झाले.
माविमने सर्वप्रथम गावातील सर्व महिलांच्या आर्थिक व सामाजिक समस्यांचा अभ्यास केला व त्याकरीता जागञत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहामधून अनेक गोष्टी लक्षात आल्या, जसे की, रात्री नऊ नंतर हा पारधी टोला जागा होतो, तेथे दारुचा महापूर येतो, रोजची भांडणे, शिव्यांचा मारा सुरु असतात. या सर्व परिस्थितीला सामोरे जात सहयोगिनीने या टोल्यांमध्ये बै�� कीचे सत्र राबविले व अनेक संकटांचा सामना करत वर्ष 2010 मध्ये प्रथम एक व नंतर तीन बचत गटांची स्थापना केली. या प्रक्रियेमध्ये कुटुंबाचा रोष देखील मो�� या प्रमाणावर पत्करावा लागला. हळूहळू या गटाला साजेशा व्यवसायाची चाचपणी सुरु केली व त्यातून कुक्कुटपालनाच्या व्यवसायावर शिक्कामोर्तब केले. रानपाखरे आणि जंगली प्राण्यांची शिकार करुन गुजराण करणा-या या समाजाला कोंबडी व्यवसायामध्ये गुंतवणे मो�� े आव्हान होते, मात्र माविमने कुशलतेने महिलांची मानसिकता तयार केली. पुरुषांनी त्यांना भरपुर विरोध केला. या सर्व वातावरणाचे मूळ दारुमध्ये आहे हे ओळखून महिलांनी हातभट्टयांना आपले निशाण बनवले व अवैध दारुबंदी आंदोलन सुरु केले. परिणामी चारपैकी तीन भट्टया कायमच्या बंद पडल्या व येथेच सक्षमीकरणाचा पाया पडला असे म्हणायला हरकत नाही.
चार बचत गटातील 45 महिलांनी कुक्कुट व्यवसायाची सुरुवात केली व रु.15,000/- चे भांडवल बचत गटातून उभे केले. माविमच्या तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत मिळणारी रु.17,000/- ची रक्कम यामध्ये मिळविण्यात आली. या महिलांची जिद्द व उत्साह पाहून कृषी विभागाने रु.17,000/- ची कोंबडीची पिल्ले गटाला दिली. महिलांची सोय लक्षात घेवून व त्यांच्या कलेनेच हा प्रकल्प यशस्वी होऊ शकतो याची जाणीव �� ेवून माविमने व्यवसायाचे प्रशिक्षणही त्यांना टोल्यावर जाऊन दिले. अशाप्रकारे भांडवल उभारल्यावर साकारला पारधी महिलांचा कुक्कुट पालन व्यवसाय !
हा होता तेजस्विनी कुक्कुटपालन महिला व्यवसाय गट. शिक्षणाचा गंध नसलेल्या, पैशांच्या नोटाही न मोजता येणा-या या महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासा�� ी नागपूर आणि इतर �� िकाणच्या पोल्ट्री उद्योगांची त्यांना तोंडओळख करून देण्यात आली. या अभ्यास दौ-यात काही शासकीय तर काही खासगी पोल्ट्री उद्योगांचा समावेश होता. कुक्कुटपालन व्यवसायासा�� ी पारधी टोल्यात सर्व महिलांना सोयीची जागा निवडणे, त्यावर देखरेख करण्यासा�� ी सदस्य महिलांची नेमणूक करणे, यासह तांत्रिक कौशल्य अवगत करणे या कामांतही या मुळातच बुज-या असणा-या महिलांनी कमालीचा उत्साह दाखविला आणि अखेरीस तो दिवस उजाडला. आतापर्यंत ज्या परिश्रमाने महिला एकत्र आल्या होत्या त्याचे परिणाम प्रत्यक्षात अनुभवण्याची ती वेळ येऊन �� ेपली होती. महिलांनी उभारलेल्या पेाल्ट्रीत कोंबडीची पिल्ले आणि भांडवल आले होते. आता याचे काय करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यानच्या काळात विरोधक थंडावले होते. त्यांचा विरोध मावळला होता. त्यांचाही पा�� िंबा मिळावा याकरता एका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्यात सहयोगिनीला आणि या व्यावसायिक बनलेल्या पारधी महिलांना यश मिळाले. पिल्लांची थेट विक्री शक्य नव्हती त्या काळात महिलांनी पिल्लांचे खाद्य, रोगराई, स्वच्छता, लसीकरणाचे तंत्र अवगत केले. यासा�� ी गावातील पशुवैद्यकीय अधिका-यांची मदत घेतली गेली. साधारणपणे 3 महिन्यांच्या कालावधीनंतर विक्रीस लायक झालेल्या या मालाची विक्री कशी करायची, हा प्रश्न महिलांना सतावू लागला. पण म्हणतात ना, इच्छा असेल तिथे मार्ग सापडतो! आजवर रानपाखरे आणि जंगली प्राण्यांची शिकार विकत घेणारे ग्राहकच उपयोगी आले. महिलांनी स्वकष्टाने उभ्या केलेल्या पोल्ट्रीमधील गाव�� ी कोंबडयांना वरोरा आणि आसपासच्या बाजारात चांगली किंमत मिळू लागली. काही धाबेवाल्यांनी आणि हॉटेल मालकांनीही या व्यवसायाला चालना देण्यासा�� ी त्या महिलांकडून माल विकत घेण्याचे �� रविले. आजवर पोलिसांच्या आणि वन विभागातील अधिका-यांच्या भीतीने व्यवसाय करणा-या या पारधी महिला ता�� मानेने व्यवसाय करू लागल्या. सर्व खर्च वगळता एका महिन्ययात एका महिलेला दीड ते दोन हजारांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. मात्र आगामी काळात गाव�� ी कोंबडी मिळण्याचे हमखास �� िकाण म्हणून ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळेल आणि त्यातून प्रत्येक सदस्यास तीन ते साडेतीन हजार रूपयांचे उत्पन्न कसे मिळेल याची आखणी सध्या सुरू आहे.
या व्यवसायात बचत गटात समाविष्ट असलेल्या फुलाबाई धोतरे ही संघर्षाची गाथा सांगताना गहिवरून जातात. पारधी महिलांच्या चार पिढया याच मातीत राहून गेल्या. मात्र आजच्या सारखी ता�� मानेने जगण्याची स्थिती या पूर्वी कधीच नव्हती, असे त्या आवर्जून सागतात. पोल्ट्री राबवणा-या पद्मा घोसरे यांनी हाडाचे पाणी करुन गो�� े फोडण्याच्या कामावर जात दिवस काढले. मात्र पारधी टोल्यांचे दिवस नक्कीच पालटतील असा �� ाम विश्वास आता त्यांच्यात निमार्ण झाला आहे. पोल्ट्रीचा व्यवसाय मार्गी लागला आहे, असे वाटत असतानाच इमारतीचे भाडे थकल्याने दुकान मालकाने सर्व कोंबडया उघडयावर सोडून दिल्या. या घटनेची जिल्हा कार्यालयाने तातडीने दखल घेतली. चंद्रपूर जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती कांता मिश्रा आणि सहयोगिनी श्रीमती अनिता ढवस यांनी सरपंचांशी चर्चा केली. त्यांनी पारधी टोल्याचे बदलेले स्वरूप आणि वातावरण लक्षात घेऊन गावाजवळील जमिनीचा एक तुकडा पारधी महिलांच्या पोल्ट्री व्यवसायासा�� ी देण्याचे कबुल केले. आजवर हेटाळणीच्या नजरेने पाहिल्या जाणा-या पारधी व्यवसायाची भरारी अभ्यासण्यासा�� ी केवळ जिल्हयातीलच नव्हे तर राज्याच्या 10 जिल्हयातील विविध बचत गटांनी गेल्या काही दिवसांमध्ये भेटी दिल्या. ही बाब जिल्हा समन्वयक अधिकारी श्रीमती कांता मिश्रा मो�� या अभिमानाने सांगतात. यावरूनच पारधी महिलांच्या सक्षमीकरणाचे मर्म लक्षात येते. कलावती नन्नावरे, नेत्रा दडमज, संगिता शिरपूरे अशी एक ना अनेक नावे सांगता येतील. पण खरं तर आता या पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून अखिल पारधी समाजाचे जीवनमान उंचावण्याचा ध्यास या महिलांना लागला आहे.
हो पण, केवळ महिलांनीच स्वतःची प्रगती साधली असे मूळीच नाही. तर गावात बचत गटांच्या दबावामुळे रस्ते आले. बोअरवेलच्या सहाय्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला. विशेष म्हणजे या पारधी टोल्यावर उभारण्यात आलेल्या कुक्कुटपालन व्यवसायाची सारी सूत्रे पारधी महिलांकडेच �� ेवण्यात आली आहेत. टोल्यांनीही आता विकासाची कामे हाती घेतली आहेत. या व्यवसायाव्यतिरिक्त मोकळया वेळात कराव्या लागणा-या विट भट्टीवरील मजूरीचा प्रश्न सोडव्ण्याचा माविमचा मानस आहे यात पारधी समाजाला ज्ञात असलेल्या व्यवसायाव्दारे हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न माविम करणार आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर येथील सावित्री लोकसंचलित साधन केंद्र वरोरा व्दारा या महिलांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण दाखविला आहे. स्वबळवर या महिलांनी समोर आलेल्या सर्व संकटांवर मात करून आपल्या मागासलेपणाची त्यांनी पारध केली आहे!
