महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) - नागरीकांची सनद

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्‍ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे.  आंतरराष्‍ट्रीय महिला वर्षाच्‍या निमित्‍ताने 24 फेब्रुवारी 1975 साली स्‍थापना झाली.  सन 2005 साली 1956 च्‍या कंपनी कायद्यातील कलम 25 नुसार 'ना नफा ना तोटा' या तत्‍वावर महामंडळाची पुर्नरचना केली.  महिलांच्‍या सर्वांगिण विकासाचे महत्त्‍व व महामंडळाची या कामातील तज्ञता ध्‍यानी घेऊन महाराष्‍ट्र शासनाने शासन निर्णय क्र.माविम-2001/प्र.क्र.10, दि. 20 जानेवारी 2003 नुसार महामंडळाला महिला विकासाची राज्‍यस्‍तरीय 'शिखर संस्‍था' म्‍हणून घोषित केले आहे.  तसेच प्रशासकीय बाबी हाताळण्‍यासाठी मुख्‍यालयात 56 अधिकारी व कर्मचारी आहेत, तर 34  जिल्‍हा कार्यालयामध्‍ये एकूण 179 अधिकारी व कर्मचारी आहेत.

ध्‍येय  - चिरंतर विकास प्रक्रियेतून महिलांसाठी सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्‍याय प्रस्‍थापित करणे.

उद्देश

 • ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करणे.
 • महिलांच्‍या क्षमता विकसीत करणे.
 • महिलांमध्‍ये आत्‍मविश्‍वास वाढविणे.
 • उद्योजकीय विकास घडवून आणणे.
 • रोजगाराच्‍या संधी व बजारपेठ यांची सांगड घालणे.
 • महिलांचा शिक्षण, संपत्‍ती व सत्‍तेत सहभाग वाढविणे.
 • स्‍थायी विकासासाठी स्‍वयंसहाय्य बचत गटांना संस्‍थात्‍मक स्‍वरूप देऊन बळकट करणे.

माविमच्‍या कार्यप्रणालीचे स्‍वरूप  -

 1. 1.    केंद्र व राज्‍य शासन पुरस्‍कृत महिलांसाठीच्‍या विविध विकासात्‍मक योजनांकरिता राज्‍यस्‍तरीय शिखर संस्‍था म्‍हणून कार्य करणे.
 2. 2.    स्‍वयंसहाय्य बचत गट, वित्‍तीय संस्‍था, स्‍वयंसेवी संस्‍था व शासनाचे संबंधित विभाग यांच्‍यामध्‍ये समन्‍वयक संस्‍था या नात्‍याने राज्‍यस्‍तरावर कार्य करणे.

 

अ.क्र.

सेवांचा तपशील

सेवा पुरविणारे अधिकारी/कर्मचारी यांचे ना व हुद्दा

सेवा पुरविण्‍याची विहित मुदत

सेवा मुदतीत न पुरविल्‍यास तक्रार करावयाच्‍या वरिष्‍ठ अधिका-यांचे नाव व हुद्दा

1

माविमच्‍या कार्यालयामध्‍ये स्‍वयंसहाय्य बचत गटांच्‍या संदर्भात माहितीची मागणी करणा-या व्‍यक्‍तींना /संस्‍थांना माहिती देणे.

 

मुख्‍यालय

श्री.महेंद्र गमरे, कार्यक्रम व्‍यवस्‍थापक

पत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर 10 दिवसाच्‍या आत

श्रीमती कुसुम बाळसराफ - महाव्‍यवस्‍थापक (प्रकल्‍प)

 

जिल्‍हा

सहा.संनियंत्रण अधिकारी

पत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर 10 दिवसाच्‍या आता.

जिल्‍हा समन्‍वय अधिकारी

2

महामंडळाव्‍दारे विविध प्रकारच्‍या स्‍वयंसहाय्य बचत गटावर आधारीत योजना त्‍या त्‍या  योजनेच्‍या मार्गदर्शक

 प्रणालीनुसार शहरी व ग्रामीण भागात राबविणे.

जिल्‍हा समन्‍वय अधिकारी, माविम  

योजनेच्‍या मार्गदर्शक तत्‍वामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे विहित कालावधीच्‍या अधीन राहून (अधिक माहितीसाठी www. mavimindia.org हे संकेतस्‍थळ पहावे)

मा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.)  - माविम

2.1

तेजस्विनी महाराष्‍ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजना

जिल्‍हा समन्‍वय अधिकारी

(33 जिल्‍हे)

2007 ते 2015

मा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.)  - माविम

2.2

अल्‍पसंख्‍यांक महिला सक्षमीकरण कार्यक्रम

सहा.जिल्‍हा समन्‍वय अधिकारी- अल्‍पसंख्‍याक योजना

( ठाणे, पुणे, नाशिक, सांगली,  वाशिम, नागपूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, मुंबई )

2007 ते 2008

मा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.)  - माविम

2.3

राज्‍यातील महिला बचत गटांना सवलतीच्‍या दराने (4%) कर्ज उपलब्‍ध करून देणे.                 

जिल्‍हा समन्‍वय अधिकारी

(33 जिल्‍हे)

2008 ते आजतागायत

माविम व नाबार्ड सहाय्यित योजनांमध्‍ये स्‍थापन झालेल्‍या विनाअनुदानित बचत गटाला कर्ज मिळाल्‍यानंतर प्रत्‍येक सहा महिन्‍यामध्‍ये त्‍यांची परतफेड (मुद्दल व व्‍याज नियमित असल्‍यास व या संदर्भात बँकेकडून शिफारस प्राप्‍त झाल्‍यानंतर एक महिन्‍याच्‍या कालावधीमध्‍ये .

मा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.)  - माविम

2.4

कृषी समृध्‍दी योजना ( CAIM) 

जिल्‍हा समन्‍वय अधिकारी - अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा

2012 ते 2018 पर्यंत 

मा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.)  - माविम

2.5

एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाच्‍या उपजिविकास विकास घटकांतर्गत स्‍वयंसहाय्य बचत गट निर्मिती, बळकटीकरण व क्षमता बांधणी कार्यकम

जिल्‍हा समन्‍वय अधिकारी

(33 जिल्‍हे)

2014 पासून सुरू

मा.उपाध्‍यक्ष तथा व्‍यवस्‍थापकीय संचालक (भा.प्र.से.)  - माविम

पत्‍ता -

महिला आर्थिक विकास महामंडळ  ( माविम)

( महाराष्‍ट्र शासन अंगीकृत)

गृहनिर्माण भवन (म्‍हाडा) , पोटमाळा, कलानगर, बांद्रा (पूर्व), मुंबई - 400 051.

फोन -  (022) 2659 1629 / 0640 / 2264 / 1213 / 0500 / 0505

फॅक्‍स - (022) 2659 0574 / 0568

ईमेल - This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.  वेबसाईट  : www.mavimindia.org

टीप  - नागरिकांसाठी सदर सनद विनामूल्‍य उपलब्‍ध करून देण्‍यात येईल.

 

Success Stories

organic-rice-sri1Organic Rice Cultivation by SRI
Agricultural activities in the field are carried out by both the man and woman in the household. Women perform activities such as seeding and weeding which require them to bend and work for long hours in the field. This caused considerable amount of drudgery for women who, aside from farming, also perform household activities on a daily basis.

read more...

 

Testimonial

विभागीय पातळीवर औरंगाबाद येथे विभागीय स्तरावरील तिसरा राजमाता जिजाऊ पुरस्कार ना. श्रीमती विद्याठाकूर (राज्यमंत्री-महिला व बाल कल्याण) यांच्या हस्ते माविम अंतर्गत लोकसंचलित साधन क्रेंद्र बीडचा एकता महिला बचत गट, बहिरवाडी मधील महिला व इतर मान्यवर. अधिक वाचा
 

Training

 • Capacity Building Training
 • SHG Concept Training
 • Leadership Development training
 • Gender Sensitization Training
 • Functional Literacy
 • Panchayat Raj Institutions

Our Products