आमची-कथा

प्रगतीकडे
वाटचाल

आमची कथा

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्‍ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे. आंतरराष्‍ट्रीय महिला वर्षाच्‍या निमित्‍ताने 24 फेब्रुवारी 1975 साली या महामंडळाची स्‍थापना झाली. महिलांच्‍या सर्वांगीण विकासाचे महत्त्‍व व महामंडळाची या कामातील तज्ञता ध्‍यानी घेऊन महाराष्‍ट्र शासनाने शासन निर्णय क्र.माविम-2001/प्र.क्र.10, दि. 20 जानेवारी 2003 नुसार महामंडळाला महिला विकासाची राज्‍यस्‍तरीय ''शिखर संस्‍था'' म्‍हणून घोषित केले आहे.

Our
Mission.

The mission of the Corporation is ‘To bring about gender justice and equality for women, investing in human capital and the capacity building of women, thus making them economically and socially empowered and enabling them to access sustainable livelihoods.’

ध्‍येय

चिरंतर विकास प्रक्रियेतून महिलांसाठी सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्‍याय प्रस्‍थापित करणे.

आमची
उद्देश

  • महिलांच्‍या क्षमता विकसित करणे.
  • महिलांमध्‍ये आत्‍मविश्‍वास वाढविणे.
  • उद्योजकीय विकास घडवून आणणे.
  • रोजगाराच्‍या संधी व बाजारपेठ यांची सांगड घालणे.
  • महिलांचा शिक्षण, संपत्‍ती व सत्‍तेत सहभाग वाढविणे.
  • स्‍थायी विकासासाठी स्‍वयंसहाय्य बचत गटांना संस्‍थात्‍मक स्‍वरूप देऊन बळकट करणे.

माविमच्‍या
कार्यप्रणालीचे
स्‍वरूप

  • केंद्र व राज्‍य शासन पुरस्‍कृत महिलांसाठीच्‍या विविध विकासात्‍मक योजनांकरीता राज्‍यस्‍तरीय शिखर संस्‍था म्‍हणून कार्य करणे.
  • स्‍वयंसहाय्य बचत गट, वित्‍तीय संस्‍था, स्‍वयंसेवी संस्‍था व शासनाचे संबंधित विभाग यांच्‍यामध्‍ये समन्‍वयक संस्‍था या नात्‍याने राज्‍यस्‍तरावर कार्य करणे.

माविमची कार्यपध्‍दती

महिला आर्थिक विकास महामंडळाचे मुख्‍य कार्यालय मुंबई येथे स्थित असून,
माविमची मुंबईसह ग्रामीण भागात 36 जिल्‍हा कार्यालये आहेत. माविममार्फत
राबविण्‍यात येणा-या सर्व योजनांची अंमलबजावणी माविम जिल्‍हा कार्यालयामार्फत
होत असते. या जिल्‍हा कार्यालयाचा प्रमुख म्‍हणून जिल्‍हा समन्‍वय अधिकारी काम
पाहतात. त्‍याचबरोबर सहा.जिल्‍हा समन्‍वय अधिकारी, लेखाधिकारी, लिपिक
असा अधिकारी/कर्मचारीवर्ग कार्यरत आहे.