कार्यकारी

माविमचे शिल्पकार

नेतृत्व
 
अध्‍यक्ष पदभार कालावधी
1.  श्रीमती प्रतिभाताई पाटील 07-08-75 11-07-76
2.  श्री.अर्जुनराव कस्‍तुरे 12-07-76 21-06-77
3.  श्री.दादासाहेब रुपवते 22-06-77 23-08-78
4.  श्री.अर्जुनराव कस्‍तुरे 24-08-78 06-04-80
5.  श्री..के.जी.देसाई 07-04-80 15-05-80
6.  श्री.श्रीधर हाटे 16-05-80 25-03-81
7.  श्री.उल्‍हास गवळी 26-03-81 15-09-81
8.  श्रीमती सलमा सिध्‍दीकी 16-09-81 06-12-82
9.  श्रीमती वसुधा देशमुख 07-12-82 04-01-87
10.  श्रीमती रजनीताई सातव 05-01-87 04-10-88
11.  श्रीमती कमलताई विचारे 05-10-88 02-11-91
12.  डॉ.विजया पाटील 04-11-91 24-04-95
13.  श्रीमती उत्‍तरा वाघ 06-02-96 09-02-99
14.  डॉ.निलम गो-हे 10-02-99 05-11-99
15.  श्रीमती रजनी पाटील 28-07-00 31-12-04
16.  श्रीमती प्रभा ओझा 02-09-06 31-08-09
17.  श्रीमती प्रभा ओझा 27-01-10 24-01-13
18.  श्रीमती ज्‍योती ठाकरे 06-09-18

श्रीमती ज्योती ठाकरे,

अध्यक्ष

24 फेब्रुवारी 1975 रोजी भारताच्‍या माजी राष्‍ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील महिलांच्‍या सर्वां‍गिण विकासासाठी माविमच्या पहिल्या अध्यक्ष होत्या याच गौरवशाली परंपरेतील 18 व्‍या अध्‍यक्ष म्‍हणजे माविमच्‍या विद्यमान अध्‍यक्ष सौ.ज्‍योती ठाकरे.

बी.ए., बी.एड्., एम्. एड्. अशी शैक्षणिक पात्रता असणा-या विद्यमान अध्‍यक्षा पी.एच.डी.च्‍या विद्यार्थीनी आहेत. डी.एड्. च्‍या परिक्षेत महाराष्‍ट्रात मेरीटमध्‍ये आलेल्‍या सौ.ज्‍योती ठाकरे यांनी सन 1994 मध्‍ये माध्‍यमिक शिक्षिका म्‍हणून जे.एन.पी.टी. (उरण), जि.रायगड येथे सुरुवात केली. शिक्षणतज्ञ कै.अनुताई वाघ यांच्‍या कोसबाड येथील विकासवाडी अध्‍यापक विद्यालयात कष्‍टकरी, पददलित, आदिवासींसाठीच्‍या अनुताईंनी साकारलेल्‍या शिक्षण योजना त्‍यांना अनुताईंच्‍या सहवासात तेथे अनुभवता आल्‍या. त्‍याचा उपयोग शिक्षकी पेशात केल्‍याने नोकरीवर असेपर्यंत शिक्षण क्षेत्रातल्‍या अनेक पुरस्‍कारांवर त्‍यांना नाव कोरता आले, ज्‍यात ज्ञानज्‍योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्‍कार, कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्‍कार, एकता कल्‍चरल अकादमीचा मधु आंबेकर राज्‍यस्‍तरीय शिक्षण पुरस्‍कारांचा समावेश आहे. आजही त्‍या सुपरिचित आहेत. अनेक संस्‍थांमध्‍ये विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करणे व समुपदेशन करणे या गोष्‍टींव्‍दारे त्‍यांनी समाजहित जोपासले आहे. शिक्षकी पेशाबरोबरच सन 2006 ला सौ.ज्‍योती ठाकरे यांची मुंबई आकाशवाणीवर हंगामी वृत्‍तनिवेदिका म्‍हणून निवड झाली. सन 2006 ते 2012 या कालखंडात मुंबई आकाशवाणीवर त्‍या वृत्‍तनिवेदिका म्‍हणून कार्यरत राहिल्‍या आणि बातम्‍यांच्‍या माध्‍यमातून त्‍यांचा आवाज घरोघरी पोहचला. साहित्‍याची आवड असल्‍याने सन 1975 पासूनच सौ.ज्‍योती ठाकरे या कोकण मराठी साहित्‍य परिषदेशी (कोमसापशी) जोडल्‍या गेल्‍या. आचार्य अत्रे कविकट्टा पुरस्‍कार प्राप्‍त सौ.ठाकरे यांना कोमसापने उत्‍कृष्‍ट ग्रामीण लेखिका पुरस्‍कारानेही गौरवले आहे. विद्यार्थ्‍यांमध्‍ये इंग्रजी निबंधलेखनाची आवड निर्माण होऊन मराठी माध्‍यमाच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये इंग्रजीची भिती नाहीशी व्‍हावी म्‍हणून I have something to say ... या पुस्‍तकाचे लेखन व संपादन त्‍यांनी केले.

सन 2012 ला सौ.ज्‍योती ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि ठाणे जिल्‍हा परिषद क्षेत्रातील कुडूस जिल्‍हा परिषदेची निवडणूक “शिवसेना” पक्षाकडून लढवून विक्रमी मताधिक्‍याने जिंकली. ठाणे जिल्‍हा परिषदेत तळमळीने विषय मांडून त्‍यांचा अभ्‍यासपूर्ण पध्‍दतीने पाठपुरावा करुन अनेक महत्‍वाचे विषय धसास लावल्‍याने एक प्रामाणिक व निःस्‍वार्थी लोकप्रतिनिधी म्‍हणून अधिका-यांबरोबरच जन-मानसात त्‍यांची प्रतिमा उंचावली. त्‍यामुळेच जिल्‍हा नियोजन समितीतही शिवसेना पक्षाने त्‍यांना सदस्‍यपदी संधी दिली. जि.प.ठाणे यांनी राबवलेला जिल्‍हा परिषद, पंचायत समिती अधिकारी व लोकप्रतिनिधींच्‍या क्षमताबांधणीच्‍या कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शिका म्‍हणून यशस्‍वी भूमिका बजावली. त्‍यानंतर सन 2013 ला हैद्राबाद येथे झालेल्‍या NRLM योजनेच्‍या देशपातळीवरील कार्यशाळेत महाराष्‍ट्र राज्‍याचे प्रतिनिधित्‍व करण्‍याचा बहुमान त्‍यांना मिळाला. त्‍यांच्‍यातील नेतृत्‍वाची चमक लक्षात घेऊन पक्षनेतृत्‍वाने नोव्‍हेंबर 2013 ला त्‍यांची पालघर जिल्‍हा संघटकपदी नियुक्‍ती केली. त्‍यानंतर झालेल्‍या ठाणे विभाजनानंतरही ठाणे जिल्‍हा नियोजन समितीतल्‍या उत्‍कृष्‍ट कारकीर्दीने पुन्‍हा एकदा त्‍यांची पालघर जिल्‍हा नियोजन समितीत सदस्‍यपदीही नेमणूक केली.

सन 2013 ते 2018 च्‍या संघर्षमय कार्यकाळात शिवसेना विशेषतः ग्रामीण भागात महिला आघाडी बांधण्‍याचं महत्‍वपूर्ण कार्य केलं. महिलांचे प्रश्‍न व समस्‍या यावर आग्रही भूमिका घेत त्‍या जिल्‍हा नियोजन समितीत मांडल्‍या. महिलांमध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण केला. खेडयापाडयात पायाला भिंगरी लावून फिरल्‍याने आणि सर्वांना सन्‍मानपूर्वक वागणूक दिल्‍याने अल्‍पावधीतच नेतृत्‍व-वक्‍तृत्‍व व कर्तृत्‍व यामध्‍ये सौ.ठाकरे यांनी स्‍वतःचा वेगळा ठसा उमटवला. सर्वांना समजेल व आकर्षित करेल अशा भाषणाच्‍या हातोटीने पालघर जिल्‍हयातल्‍या दूर्गम, अतिदूर्गम, सागरी-नागरी, डोंगरी भागातही त्‍यांनी विकासकामांचा विश्‍वास निर्माण केला. कुपोषण, बालमृत्‍यु या जिल्‍हयातील समस्‍यांवर आक्रमक भूमिका घेत त्‍या सोडवण्‍याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला.

आज माविमच्‍या अध्‍यक्षपद भूषवणा-या सौ.ज्‍योती ठाकरे हया शिवसेनेच्‍या पालघर लोकसभा समन्‍वयक असून, संपर्क संघटक म्‍हणून जालना व हिंगोली या दोन जिल्‍हयांची जबाबदारी पेलतात. आजही त्‍या पालघर जिल्‍हा नियोजन समितीच्‍या विद्यमान सदस्‍य असून, कोकण मराठी साहित्‍य परिषदेच्‍या राज्‍यस्‍तरीय महिला साहित्‍य संमेलन समितीच्‍या त्‍या केंद्रिय सदस्‍य आहेत. युवासेना प्रमुख शिवसेना नेता आमदार मा.आदित्‍यजींच्‍या कल्‍पनेतील “प्रथम ती” हा राज्‍यातील महिलांसाठीचा कार्यक्रम महाराष्‍ट्रभर पोहचवण्‍यात एक टिम लीडर म्‍हणून खारीचा वाटा उचलता आला याचे समाधान त्‍यांच्‍या चेह-यावर नित्‍य विलसत असते.

सौ.ज्‍योती ठाकरे ह्या खऱ्या नेत्या असून महिलांच्या जिवनात सुधारणा आणण्याचा संकल्प केला आहे. शिक्षक म्हणून आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची नेतृत्व भूमिका आजपर्यंत सर्व महिलांसाठी प्रेरणादायक आहे.

श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा,

व्यवस्थापकीय संचालक

 

महिला आर्थिक विकास महामंडळ हा महाराष्‍ट्र शासनाचा उपक्रम आहे.  जो महिला सक्षमीकरण, आर्थिक समावेशन, उपजिविका विकास, लोकसंस्‍था उभारणी यासारख्‍या महत्‍वपूर्ण बाबींवर काम करीत आहे.  गेल्‍या एक वर्षापासून महामंडळाच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणून श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा या कार्यरत आहेत.

त्‍यांनी सन 2005 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून नागरी सेवांसह करिअरची सुरूवात केली, नैनीताल येथे त्‍यांनी ग्रामीण विकास, पर्यटन, पर्यावरण या विषयांवर काम केले.  येथे काम करीत असतानाच त्‍यांच्‍या मनात महिलांचा विकास, महिलांच्या समस्यांसाठी उत्कटत भावना निर्माण झाली आणि शेवटी त्‍यांना 2018 मध्ये माविमचा कारभार हाती घेण्याच्या निर्णयाला प्रेरित केले.

सन 2007 मध्ये त्‍यांची निवड भारतीय महसूल सेवा (आयआरएस) साठी झाली.  तिथे त्‍यांनी  सेवा कर (जीएसटी) विभाग, मध्यवर्ती विभाग, कर उत्पादन शुल्क, सीमाशुल्क अशा अनेक विभागांमध्‍ये काम केले.  नंतर त्यांनी वस्तू आणि सेवाकर या विभागात काम केले. त्‍यांच्‍या कामाचे स्‍वरूप व बदल्‍यांमुळे त्‍यांना महाराष्‍ट्रातील कानाकोप-यापर्यंत उदा.नागपूर, चंद्रपूर, नांदेड, कोल्हापूर, मुंबई इ. ठिकाणी काम करण्‍याची संधी मिळाली.

श्रीमती. श्रद्धा जोशी शर्मा या उत्तराखंडच्‍या मूळ रहिवासी असून, त्‍यांनी गुरुकुल कांगड़ी विद्यापीठ, हरिद्वार मधील वैद्यकीय विज्ञान (आयुर्वेद) पदवी संपादन केली आहे.  तसेच मुंबईतील जेबीआयएमएसकडून एमबीए, पदवी संपादन केली आहे.  फावल्‍या वेळ्यात त्‍यांना कुटुंबासमवेत राहणे, वाचन, प्रवास करणे व स्वयंसेवी संस्थांमध्‍ये मार्गदर्शन करणे आवडते.