माविमचा इतिहास

समान हक्‍क
समान संधी

माविम बाबत

“आंतरराष्‍ट्रीय महिला वर्षाच्‍या” निमित्‍ताने सन 1975 साली  महामंडळाची स्‍थापना करण्‍यात आली. सुरुवातीच्‍या काळात महामंडळाने व्‍यावसायिक व व्‍यापारी तत्‍वावर आधारित योजनांवर भर देत असे.  साधारणतः १९९० साली आंतरराष्‍ट्रीय कृषि विकास निधी या महत्‍वपूर्ण भागिदार संस्‍थेच्‍या स‍हाय्याने माविमने ४ मुख्‍य उद्दीष्‍ट्ये ठरवून घेतली.
• महिलांची क्षमतावृध्‍दी
• लोकसंस्‍था बांधणी
• पतपुरवठयाची उपलब्‍धता
• माहितीचा स्‍त्रोत निर्माण करणे.

कुटुंब, शेती व पशुसंवर्धन अशा वेगवेगळया क्षेत्रात महिलांचा
सक्रिय सहभाग असूनही महिलांच्‍या श्रमाची दरडोई उत्‍पादन क्षमता कमी दिसून येते.
महिलांनी कितीही मेहनत केली तरी त्यांनी केलेल्‍या श्रमाची दखल घेण्‍यात येत नव्‍हती.
त्‍यामुळे त्‍यांची स्‍वतःची अशी पत नव्हती.

बराच काळ,  विकासात्‍मक कार्यक्रमात महिलांच्‍या गरजा व प्राधान्‍य
यावर लक्ष केंद्रीत केले गेले नव्‍हते. माहितीच्‍या स्‍त्रोतामुळे महिलांच्‍या
प्रश्‍नांना वाचा फुटली आणि त्‍याचबरोबर लिंग समभावाचा मुख्‍य
धोरणे व विकासत समावेश होऊ लागला.

याचवेळी जगभरात स्‍वयंसहाय्यता बचत गटाची
चळवळ सुरु झाली. त्‍यामुळे महिलांच्‍या समस्‍यांकडे
नवीन दृष्‍टीकोनातून बघण्‍याचा मार्ग मोकळा झाला.

महिलांना सामाजिकदृष्‍टया सक्षम करुन निर्णय प्रक्रीयेत
सहभागी होता यावे याकरीता स्‍वयंसहाय्य बचतगट,
तंत्रज्ञान व महिला सक्षमीकरण  कार्यक्रम / योजना
असे एकत्रित बहुआयामी कायर्क्रमांची निर्मिती करण्‍यात आली.

प्रेरणादायी
सामाजिक बदल

माविमच्‍या
दृष्‍टीकोनाबाबतची पार्श्‍वभूमी

स्‍वयंसहाय्य बचत गट हे माध्यम
मुलभूत पाया आहे.

स्‍वातंत्र्य
निर्माण करणे

Build gender sensitivity in women
and with men

माविम एक
चांगला मध्‍यस्‍थ (उत्‍प्रेरक)

Playing the role of educators
and facilitators