माविमचे प्रमुख कार्यक्रम

माविमचे
प्रमुख कार्यक्रम

माविमच्‍या कार्याबाबत

महाराष्‍ट्र राज्‍य ग्रामीण जीवनोन्‍नती अभियान

महाराष्‍ट्र राज्‍य ग्रामीण जीवनोन्‍नती अभियानाअंतर्गत ठाणे (भिवंडी, शहापूर), सोलापूर (माळशिरस,मोहोळ) व गोंदिया (सालेकसा, तिरोडा) या तीन जिल्‍हयामध्‍ये एकूण सहा तालुक्‍यांकरीता तीन वर्षासाठी तांत्रिक तज्ञ व अंमलबजावणी संस्‍था म्‍हणून निवड करण्‍यात आलेली आहे. सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी माहे मार्च 2023 पर्यंत राहील

+ Details

दिनदयाळ उपाध्‍याय अंत्‍योदय योजना-राष्‍ट्रीय नागरी उपजिवीका अभियान

महिला आर्थिक विकास महामंडळ या प्रकल्‍पामध्‍ये संसाधन सस्‍था म्‍हणून भूमिका बजावेल व सदर प्रकल्‍प राज्‍याच्‍या 34 जिल्‍हयांतील 250 शहरांत राबविण्‍यात येईल. सदर प्रकल्‍प माहे सप्‍टेंबर 2017 पासून अभियानाच्‍या कालावधीपर्यंत सुरु राहील. या प्रकल्‍पात शहरातील गरीब व त्‍यांच्‍या संस्‍थांचे बळकटीकरण करणे व त्‍यांना क्षमतावृध्‍दीपर प्रशिक्षण देणे अशी माविमची भूमिका राहील.

+ Details

तेजस्विनी महाराष्‍ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम

महाराष्‍ट्र शासन व आयफॅड यांच्‍या सहाय्याने महाराष्‍ट्रातील 33 ग्रामीण जिल्‍हयात जुलै 2007 ते सप्‍टेंबर 2018 पर्यंत यशस्‍वीरित्‍या राबविण्‍यात आला.

+ Details

कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प

महाराष्‍ट्र शासन व आयफॅड यांच्‍या सहकार्याने कृषी समृध्‍दी समन्‍वयित कृषी विकास प्रकल्‍प सन 2009 पासून कार्यान्वित करण्‍यात आलेला आहे. सदर कार्यक्रम जून 2019 अखेर संपुष्‍टात येत आहे.

+ Details

अल्‍पसंख्‍यांक महिला सक्षमीकरण कार्यक्रम

महाराष्‍ट्र शासनाच्‍या अल्‍पसंख्‍यांक विभाग व अल्‍पसंख्‍यांक आयोग यांच्‍या मदतीने एकूण 10 अल्‍पसंख्‍यांक बहुल शहरांमध्‍ये सन 2011-12 ते 2018-19 या (मुंबई-धारावी, चांदिवली, ट्रॉम्‍बे, ठाणे-भिवंडी, मुंब्रा -कौसा, नाशिक-मालेगाव, औरंगाबाद-परभणी, नांदेड, वाशिम-कारंजा, नागपूर, पुणे व सांगली-मिरज) राबविण्‍यात येत आहे.

+ Details