हस्तक्षेप करण्याचे क्षेत्र

माविमच्‍या कामाची रणनीती म्‍हणून कोणत्‍याही स्‍वयंसहाय्य बचत गटावर आधारित कार्यक्रम/प्रकल्‍प यामध्‍ये खालील चार प्रमुख घटकांवर भर दिला जातो

माविमचे कार्य

संस्‍था बांधणी व
बळकटीकरण

माविमचा विश्‍वास आहे की, संस्‍था बांधणी व बळकटीकरणाची प्रक्रियामहिलांच्‍या सामुदायिक विकासात महत्‍त्‍वपूर्ण भूमिका बजावते. संस्‍था बांधणीच्‍या प्रक्रियेत स्‍वयंसहाय्य बचत गट, ग्राम विकास समित्‍या व क्‍लस्‍टर स्‍तरावर स्‍वयंसहाय्य बचत गटाचे फेडरेशन अर्थात लोकसंचलित साधन केंद्राचा (सीएमआरसी) समावेश होतो. महामंडळाने बांधणी केलेल्‍या संस्‍थांनी सामाजिक भांडवल, लोकशाही गव्‍हर्नन्‍स, सदस्‍यांना विविध कार्यक्रम आणि सेवा देण्‍यासाठी प्रशासकीय प्रणाली विकसित केली आहे. सोबतच सोशल एंटरप्राईज डेव्‍हलपमेटसारखे उपक्रम हाती घेणे व विविध भागिदारांच्‍या माध्‍यमातून संसाधन एकत्र करणे यावर भर दिलेला आहे.

महिला सक्षमीकरण व
सामाजिक समानता

या घटकांतर्गत प्रामुख्‍याने
महिलांचे हक्‍क/ अधिकार,
लिंगसमभाव तसेच, आरोग्‍य
व स्‍वच्‍छता या विषयावर
कार्य करण्‍यात आले आहे.

उपजिवीका व
इंटरप्राईज विकास

महिलांना उत्‍पन्‍नाचे स्‍त्रोत उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी, महिलांकडे असणारी कौशल्‍ये विकसित करणे आणि नवीन कौशल्‍यांची ओळख करुन देणे. प्रगत तंत्रज्ञान व श्रमाची बचत करणा-या पायाभूत सुविधांची ओळख करुन देऊन महिलांचा इंटरप्राईज विकासात सहभाग वाढविणे. महिलांनी उत्‍पादित केलेल्‍या मालाला बाजारपेठ मिळवून देण्‍यासाठी आवश्‍यक ते सहकार्य करणे.

सूक्ष्‍म वित्‍त
सेवा

या घटकांतर्गत –
1. अंतर्गत बचत आणि कर्ज व्‍यवहार.
2. मोठया रक्‍कमेचे कर्ज मिळविण्‍यासाठी बॅंका
व इतर वित्‍तीस संस्‍थांसोबत भागिदारी करणे.
3.स्‍वयंसहाय्य बचत गटातील महिलांना विम्‍याचा लाभ मिळवून देण्‍यासाठी विमा कंपन्‍यांशी जोडणे.

आमचे
कार्यपध्‍दती

A step-by step walk through of our
operational strategies & and their execution.

पहिला टप्‍पा

स्‍वयंसहाय्य बचत गट

सहयोगिनीमार्फत 10 ते 12
महिलांना संघटित करुन
स्‍वयंसहाय्य बचत गटाची स्‍थापना.

बचत

महिलांना दरमहा मासिक
बैठक व मासिक बचत करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देणे.

अंतर्गत कर्जव्‍यवहार

गटात ठराविक रक्‍कम जमा झाल्‍यावर
अंतर्गत कर्जव्‍यवहार करण्‍यात येतो.

दूसरा टप्‍पा

चांगल्‍या उपजिवीकेची हमी

या टप्‍प्‍यात स्‍वयंसहाय्य बचत गटांचे
फेडरेशन (लोकसंचलित साधन केंद्र)
तयार केले जाते. हे फेडरेशन गटांना व महिलांना
चांगल्‍या उपजिवीकेची हमी मिळावी याकरीता
आवश्‍यक ती मदत करते.

बँकांकडून कर्ज मिळवून देण्‍याची हमी

गरीबांपर्यंत सेवा पोहोचविण्‍याची महत्‍वाची
भूमिका सीएमआरसीमार्फत बजावली जाते.
सीएमआरसीच्‍या मदतीने महिलांना
बँकांकडून कर्ज मिळविण्‍यास सहकार्य होते.

बाजारपेठेची संधी उपलब्‍ध करुन देणे

महिलांनी उत्‍पादित केलेल्‍या वस्‍तूना
बाजारपेठ मिळवून देण्‍याकरीता सीएमआरसी
मध्‍यस्‍थीची भूमिका बजावते.

तिसरा टप्‍पा

मार्गदर्शक

माविमने स्‍थापित केलेल्‍या
सीएमआरसींना माविम मार्गदर्शकाची भूमिका बजावते.

नाविन्‍यता आणि भागिदारी

नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल/कल्पना,
नवीन भागीदारी यासाठी सीएमआरसीची
क्षमता वाढविण्यात माविम मदत करते.